जळगाव (प्रतिनिधी ;- )महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्क, मुंबई बांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक १ डिसेंबर २०२४ हा जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरावाडा म्हणून पाळला जातो. या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हाभरामध्ये विषेशतः लक्षात घेता युवा वर्गामध्ये व सामान्य जनतेमध्ये एच. आय. व्ही/ एड्स विषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याने या दिवसाचे औचित्य साधून जनतेमध्ये एच. आय. व्ही विषयी असलेले गैरसमज दुर करुन जनजागृती करण्याच्या दुष्टीने प्रभातफेरी व पोस्टर्स प्रदर्शन तसेच पथनाट्याचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले होते.
०१ डिसेंबर, जागतिक एड्स दिनांचे औचित्य साधून जागतिक एड्स नियंत्रण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य एइस नियंत्रण संस्था अंतर्गत राज्यभर आयोजीत होणा-या जागतिक एड्स नियंत्रण दिन व सप्ताहची सुरुवात करण्यात आली. यावर्षीचे “Take the rights path (मार्ग हक्काचा, सन्मानाचा हे घोष वाक्य असून प्रत्येक व्यक्तीने एचआयव्ही / एड्स विषयक जास्तीत जास्त माहिती मिळविणे, एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपायांचे अनुकरण करणे, एचआयव्ही तपासणी करुन घेणे, आणि त्यासंवधी औषधोपचार मिळविणे हा त्याच्या आरोग्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती, सामान्य रुग्णालय, जळगांव यांच्या तर्फे जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने प्रभातफेरी, पोस्टर्स प्रदर्शनाचे व पथनाटयाचे विशेष आयोजन शासकिय वैदयकिय महाविदयालय व रुग्णालय आवारामध्ये करण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रथम १९८८ साली जागतिक एड्स दिनाची घोषणा केली त्यानंतर पुढे दर वर्षी दि.१ डिसेबर हा दिवस संपूर्ण जगभर एड्स नियंत्रण दिन म्हणून आयोजीत केला जातो. एड्स विरुध्दच्या लढवामध्ये सहभागी असलेल्या संस्था, व्यक्ती व इतर सर्व जण यांना वर्षभर केलेल्या कामाबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी तसेच आपापल्या अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी आणि एकत्रितपणे एड्स विरोधी लढयाची भूमिका ठरविण्यासाठी एड्स दिनाचे आयोजन जगभरात केले जाते. तसेच एड्स विरुध्दची लढाई ही फक्त आरोग्य सेवेपूर्ती मर्यादित नसून प्रत्येक व्यक्तीची आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या सहकार्य व योगदानाशिवाय हि लडाई अपूर्ण आहे. त्याकरिता प्रत्येकाने या दिवसाचे औचित्य साधून एड्स विरुध्दच्या लढाईत सहभागी होण्याच्या हेतून आज संपूर्ण महाराष्ट्राभर एड्स विरोधी अभियान राबविले जात आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. अति जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय डॉ. आकाश चौधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव बेचील अॅड शिल्पा रावेरकर, शासकिय आयुर्वेद महाविदवालयाचे मा. डॉ. दव्हेकर, कवची उमवि राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. सचिन नांद्रे, कवची सामाज कार्य महाविदयालयाचे डॉ. मनोज इंगोले, शासकिय नर्सिंग महाविदयालयाचे प्राचार्य श्रीमती नेतकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, वैदयकिय अधिकारी डॉ. रेश्मा उपाध्ये, डॉ. अनुपमा जावळे मंचावर उपस्थित होते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी थी. संजय पहूरकर यांनी केले. जागतिक एड्स दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कार्यालयातंर्गत जिल्हयात सुरु असलेल्या विविध सुविधा केंद्राची माहिती दिली. त्यामध्ये एच. आय. व्हीसह जीवन जगणा-या सर्व व्यक्तीना मोफत औषधोपचार, तपासणी व अधिकारांवावत माहिती दिली.
विनोद डगे व त्यांचे पथकाने दिशा बहुउददेशीय संस्था, जळगाव यांचेमार्फत महाराष्ट्र गीत गावन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सामाजकार्य महाविदयालय शाखा, कववित्री बहिणवाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदबापीठ, जळगाव यांचेवतीने एचआयव्ही/एड्स विषयी प्राध्यापक डॉ. श्री. मनोज इंगोले व विदयार्थी यांनी फलॅशमॉव व पचनाटव कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना एचआयव्ही/एड्स विषयी शपथ देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते एचआयव्ही प्रतिबंधात्क चिन्ह फुग्यांसह सोडण्यात आकाशात सोडण्यात आले. आणि उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते प्रभातफेरीस हिरवा झेंडी दाखविण्यात आला व प्रभातफेरी मार्गस्थ करण्यात आली.
सदर प्रभातफेरीमध्ये कवयित्री बहिणवाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथील डॉ. आर. एस. गवारे, डॉ. विशाल देशमुख, डॉ. के. वी. पटील, डॉ. गणपत धुमाळ, डॉ. तनविर खान, डॉ. भारती गायकवाड, डॉ. मनोज इंगोले, अनिल बेलसरे, सहभागी झाले होते.