जामनेर:- घरात कोणीही नसताना अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शहरातील शास्त्रीनगर भागात घडली आहे.
सूत्राने दिलेली माहिती अशी की शास्त्रीनगर भागात राहणारे खुशाल सिंग पवार हे लग्न समारंभ आणि छोटे-मोठे कार्यक्रमांच्या ऑर्डर घेत असून ते स्वतः स्वयंपाकी आहे. ते व त्यांची पत्नी हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांच्या घराला मोठी आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला यावेळी गॅस सिलेंडर वरील बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जामनेर तालुक्याच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत घरातील टीव्ही फ्रिज यासह विविध संसार उपयोगी साहित्य जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग ही देवाऱ्यात लावलेल्या दिव्यामुळे लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.