जळगाव (प्रतिनिधी) ;-ट्रॅक्टर ट्रॉलीचा तुटलेला एक्सेल दुरुस्तीसाठी एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथून मेकॅनिक सोबत आलेल्या एका वीस वर्षे तरुणाचा ट्रॉली खाली जॅक सरकल्यामुळे दबला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोरनार गावात घडली. या प्रकरणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.सोमनाथ गोरख कोळी वय 20 रा. भातखेडा तालुका एरंडोल असे मयत तरुणाचे नाव आहे.
बोरणार गावात चॅट तुटल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या दुरुस्त्यासाठी मेकॅनिक सोबत आलेल्या भातखेडा येथील सोमनाथ हा दुरुस्तीसाठी ट्रॉली च्या खाली काम करीत असताना ट्रॉलीला लावलेला जॅक अचानक निसटल्याने सोमनाथ कोळी याच्या अंगावर पडल्याने त्याचा दबून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तात्काळ बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.