जळगाव – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग जी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये 14 मे रोजी संभाजीनगर येथेझालेल्या राजपूत समाजाच्या वीर महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात समस्त राजपूत समाजाने जातवैधता प्रमाणपत्रासह इतर मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मान्य करून त्यावर पंधरा दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजपूत समाजास आश्वासन दिले होते.
त्यानुसार 26 जुलै रोजी एका बैठकी व्यातिरित आजपर्यंत शासनाकडून मागण्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने
गिरीश परदेशी हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसले आहे त्यांच्या समर्थनार्थ राजपूत समाज बांधव मोठया संख्येने आंदोलनात बसले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला यावेळी ॲड रोहिणी खडसे संबोधित करताना म्हणाल्या वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या विचारांचा पाईक असलेला मोडेल पण वाकणार नाही या बाण्याने चालणारा राजपूत समाज आहे
राजपूत भामटा,परदेशी भामटा या जातीस जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सुरळीतपणे देण्यात यावे, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. महाराणा प्रतापसिंह यांची जयंती दिनी 9 मे रोजी जन्मतिथीनुसार साजरी करावी.या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय,निमशासकीय वसतीगृहे स्थापन करावीत. महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याचा प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश करावा. भारत सरकारने घुमंतू, अर्ध घुमंतू भटक्या, विमुक्त जनजातीच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या बाळकृष्ण रेणके व दादा विधाते आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात. विमुक्त जाती,भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. विमुक्त,भटक्या व ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी अशा राजपूत समाज बांधवांच्या मागण्या आहेत . या सर्व मागण्या रास्त असुन शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि राजपूत समाज बांधवांना दिलेले आश्वासन पाळावे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपोषणास पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आ एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी राजपूत समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सभागृहात मांडलेला आहे आम्हीं समाजाच्या पाठीशी असुन समाज हाक देईल तिथे आम्ही उपस्थित असु असे उपस्थितांना आश्वासन दिले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक अध्यक्ष रिंकु चौधरी, बोदवडचे नगरसेवक भरतआप्पा पाटील, अजय बढे,विलाससिंग पाटील , चेतन राजपूत,किरण राजपूत, डॉ संग्रामसिग सुर्यवशी , डॉ रिजवान खाटीक, हितेश जावळे , प्रतिभाताई शिरसाट, सुमनताई बनसोडे , वर्षाताई राजपूत, शितलताई म्हसणे आदी उपस्थित होते.