सामाजिक कार्यकर्ते गणेश डेंगे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी असलेले लाचखोर दीपक पाटील यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांना एका पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की ,जळगाव परिवहन विभाग अधिकारी दीपक पाटील व त्यांच्या विभागात काम करणारे इन्स्पेक्टर नवापूर(सीमा) नाका येथे येथे ड्युटी लावण्यासाठी तीन लाखाची खंडणी मागणारे दीपक पाटील व त्यांचे पटर भिकन भावे यांना डिसेंबर महिन्यात रंगेहात औरंगाबाद येथील अँटी करप्शन विभागाचे अधिकारी यांनी पकडले त्यानंतर जळगाव परिवहन अधिकारीदीपक पाटील व त्यांचा पंटर भिकन भावे यांना जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले अचानकदीपक पाटील यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळेच दीपक पाटील यांना अटक करण्यात आली नाही मागच्या महिन्यात घडलेली घटना अजून पर्यंत दीपक पाटील यांना अटक झाली नाही त्यांनाअटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला व त्यांचे निलंबन ही झाले नाही संविधानाच्या विरोधात कार्यक्रम सुरू असून दीपक पाटील यांना कोणाचा आशीर्वाद अँटी करप्शन विभागाने मुद्देमाल सहित पकडल्यामुळे कार्यवाही 100% झालीच पाहिजे होती पण तसेझाले नाही उलट तपास अधिकारी यांच्यावर संशय व्यक्त करण्यातयेत आहे यांना अटक का झाली नाही एवढा मोठा गुन्हा असल्यामुळे पीसीआर व एमसीआर काहीच झालेलं नाही.
दीपकपाटील यांचा पर्सनल सेक्रेटरी भिकन भावे याला एक दिवस अटक करून दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर झाला या दोन्हींच्या फोन च्या डिटेल्स सीडीआर तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी असे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी आपल्या अर्जात मागणीकेली आहे डिसेंबर महिन्यात सीमा नाक्यावर ज्या इन्स्पेक्टरचीड्युटी लावण्यात आली होती त्यांच्या फोनची डिटेल्स सीडीआरचौकशी करण्यात यावी मलाईदार चेक पोस्ट नाक्यावर कितीवसुली झाली ही चौकशी सुद्धा करण्यात यावी
यामुळे त्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचार केला हे जनतेला माहित पडेल सरकारी आदेशा ची पायमल्ली होत असून मुख्यमंत्री यांना ई-मेल अर्ज करून हि कार्यवाही होत नाही दीपक पाटील यांना सरकारी राजश्रय मिळत असल्याची चर्चा जोरात सुरू असून कार्यवाही कधी करणार अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी विलंब का? असा सवाल उपस्थित करून त्यांच्यावर त्वरित
कार्यवाही करण्यात यावी असे ई-मेल पत्रात सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी म्हटले आहे