प्रा. अनिलकुमार दुलीचंद विश्वकर्मा यांना पीएच.डी. (डॉक्टरेट) प्रदान..
अणूविद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग)मध्ये महत्वपूर्ण संशोधन
भुसावळ प्रतिनिधि l २० जुलै २०२३ l जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशन्स गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एआय आणि डाटा सायन्स विभागाचे प्रमुख प्रा. अनिलकुमार दुलीचंद विश्वकर्मा यांना नुकतीच कवयित्री हिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत अणूविद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग) विषयामध्ये पीएच. डी. (डॉक्टरेट) पदवी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, उपकुलसचिव (संशोधन) वि. व. तळेले, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.प्रा. अनिलकुमार दुलीचंद विश्वकर्मा यांनी स्ट्रैटेजीस फॉर डायनमिक स्पेक्ट्रम अलॉकेशन इन फ्यूचर वायरलेस नेटवर्क या विषयावर शोधप्रंध सादर केला व त्यांना भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचालित, श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अणूविद्युत आणि दूरसंचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गिरीश अशोक कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा. अनिलकुमार दुलीचंद विश्वकर्मा यांच्या यशाचे कौतुक गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकीताई पाटील, इतर पदाधिकारी तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. डॉ. विजयकुमार एच. पाटील व श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. डॉ. राहूल बी. बारजीभे, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकवर्ग करीत आहे.