अमळनेर : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेने वादाच्या कारणावरून 35 जणांविरुद्ध पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एकाने फिर्यादी महिलेच्या घरात घुसून तिच्या अकरा वर्षीय मुलीला लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 3 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आले असून या पकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीची आई ही गच्चीवर कपडे टाकण्यास 3 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास गेली असता आरोपी भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे याने घरात शिरून लहान भावाला झोका देणाऱ्या 11 वर्षीय मुलीला पकडून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरड केल्यामुळे पीडित मुलीची आई धावून आल्याने आरोपी हा पळून गेला. पीडित मुलीशी याबाबत विचारणा केले असता तिने भाऊसाहेब याने घरात येत पॅन्ट काढून पूर्ण कपडे न काढल्यास तुझ्या लहान भावाला मारून टाकेल अशी धमकी दिल्याची माहिती दिल्याने
याबाबत फिर्यादी महिला ही त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी भाऊसाहेब याच्या आईकडे गेली असता त्याची आई उषाबाई बोरसे हिने शिवीगाळ करून आमच्या विरुद्ध पोलिसात केलेल्या तक्रारीत 35 जणांची नावे टाकली असून ती कमी न केल्यास आम्ही असेच करू अशी धमकी दिली.
यानंतर पीडित मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्टेशनला धाव घेत 4 रोजी भाऊसाहेब उर्फ प्रशांत बोरसे याच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर हे करीत आहेत.