राजकीयशासकीयसामाजिक

..तर राजीनामा देण्यास तयार..’; धनंजय मुंडेंचे सूचक विधान

..तर राजीनामा देण्यास तयार..’; धनंजय मुंडेंचे सूचक विधान

बीड वृत्तसंस्था

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाब वाढत चालला आहे. याच दरम्यान, काल धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सर्व आमदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले,” पक्ष आणि अजित पवार यांच्या आदेशानुसार मी लगेच राजीनामा देण्यास तयार आहेत. माझ्या विषयी काय करायचं हे तेच ठरवतील.” पण काही व्यक्ती माझ्यावर वैयक्तिक राग ठेवून आरोप करत असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. काल रात्री, अजित पवार यांच्या समोरच धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर भूमिका मांडली. यावेळी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोर आपली बाजू मांडली. तसचे, अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांविषयी अजित पवार यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना माहिती दिली. अंजली दमानिया यांनी दिलेले सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले असल्याचे अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील वातावरण तापलं असल्याने, सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अशातच धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि ते केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. याचवेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आजपासून तीन दिवस दिल्लीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिल्लीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय होणार का, यावर चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसांत या मुद्द्याला योग्य वळण मिळण्याची शक्यता आहे.

संंतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये वाल्मिक कराडची पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, तसेच सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह जवळपास 150हून अधिक जणांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button