
मारहाण करीत एकाच्या खिशातून रोकड लांबविली
जळगाव प्रतिनिधी
काहीही कारण नसतांना एकाला मारहाण करून रोकड लांबविल्याची घटनाला रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भाऊंचे उद्यान येथे घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,
सुभाष रामराव घुगे (वय-३४, रा. अकोला, ह.मु. आयोध्या नगर, जळगाव) हे रविवारी दुपारी ते भाऊंचे उद्यानाजवळ आले असता, एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी घालून शिवीगाळ करीत मारहाण करून त्यांच्या खिशातील रोकड हिसकावून पसार झाला.
सुभाष घुगे यांनी याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलायाबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे तपास करीत आहेत.