
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कायदा सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर तीव्र नाराजी
जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जळगाव जिल्हा तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न
निवेदनाद्वारे राज्यात वाढत्या गुन्हेगारीचा कडाडून निषेध करण्यात आला आणि खालील घटनांबाबत त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .
मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कन्येसह तिच्या मैत्रिणींना गावगुंड व सराईत गुन्हेगारांनी छेडछाड करण्याची घटना घडली.
पुण्यातील स्वारगेट बस डेपो परिसरात महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी.
राज्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, गुन्हेगार निर्भयपणे गुन्हे करत आहेत. पोलिस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या
विजेच्या तुटवड्यावर त्वरित तोडगा काढा
निवेदनात जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींवरही भर देण्यात आला.
सध्या रब्बी हंगामात मका, गहू, ज्वारी, हरभरा आणि उन्हाळी बाजरी मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे.
पीक अंतिम टप्प्यात असताना शेती पंपांसाठी वीजपुरवठा अनियमित आहे.
अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळत असून नवीन ट्रान्सफॉर्मर उशिराने मिळत आहेत, त्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे.
तात्काळ वीज विभागाला आदेश देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगराध्यक्ष एजाजभाई मलिक, वाय. एस. महाजन, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकूभाऊ चौधरी, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, डॉ. रिजवान खाटीक, अशोक सोनवणे, सुनिलभैय्या माळी, किरणभाऊ राजपूत, राजुभाऊ मोरे, रमेश बारे, भाऊराव इंगळे, गौरव वाणी, संजयभाऊ चौव्हाण, एस. डी. पाटील, रहीमभाऊ तडवी, सौ. सुमनताई बनसोडे, सौ. कलाताई शिरसाट, सौ. पूनमताई खैरनार, सौ. सिताताई गांगले, सौ. रेखाताई सोनवणे, ॲड. विक्रम शिंदे, राजू बाविस्टर, मतिन सैय्यद, रफिक पटेल, सालिल पटेल, नईमभाऊ खाटीक, विशाल देशमुख, महेश बोरसे, फैजान खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारला इशारा – मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.