खान्देशगुन्हेजळगांव

अपहरणाच्या संशयावरून तरुणाने तलवार घेऊन वाल्मीक नगरात घातला धुडगूस !

प्रार्थनास्थळाजवळ साहित्याची तोडफोड; परिसरात दहशतीचे वातावरण

अपहरणाच्या संशयावरून तरुणाने तलवार घेऊन वाल्मीक नगरात घातला धुडगूस !

प्रार्थनास्थळाजवळ साहित्याची तोडफोड; परिसरात दहशतीचे वातावरण

जळगाव प्रतिनिधी – शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. रविवारी (१६ मार्च) वाल्मिक नगरात अपहरणाच्या संशयावरून एका तरुणाने तलवार घेऊन परिसरात दहशत माजवत प्रार्थना स्थळ जवळ असणाऱ्या परिसरात तोडफोड केली. याप्रकरणी प्रवीण रमेश कोळी (वय ३०, रा. वाल्मिक नगर, पिंजारी वाडा) याच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे ,तसेच अपहरण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान चार वर्षापुर्वी मक्का मशिदीचे मौलाना कोनेन अख्तर यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या तरुणाने पुन्हा याच भागात गोंधळ घालून दहशत माजविली आहे.

शहरातील वाल्मिक नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असतांना काही संशयीत इसम त्याठिकाणी आले. त्या इसमांकडून त्या मुलाचे अपहरण केले जात असल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आला. या घटनेची माहिती मिळताच त्या परिसरात राहणारा प्रवीण रमेश कोळी हा त्याठिकाणी आला. त्याने घरातून धारदार तलवार घेवून तो त्या इसमांच्या मागे धावत सुटला. त्यामुळे ते इसम देखील त्या परिसरातून पळून गेले. दरम्यान, ते इसम एका धार्मीक स्थळाच्या दिशेने गेल्याचे समजल्यानंतर प्रवीण कोळी हा तलवार घेवून त्याठिकाणी गेला. त्याने धार्मीक स्थळाच्या आवारात ठेवलेले माठ आणि प्लास्टीकची पाण्याची टाकी तलवारीने फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ गिरीश पाटील, गजानन पाटील, अनिल कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दहशत माजविणाऱ्या संशयीत प्रवीण कोळी याला ताब्यात घेतले.
धार्मीक स्थळाच्या आवारात तोडफोड केल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करु लागले. यावेळी दोन्ही गटातील नागरिक समोरासमोर आल्यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या आठवड्यातील तिसरी धक्कादायक घटना!

शनिपेठ परिसरात मागील आठवड्यात अशाच प्रकारच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या, ज्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. काट्या फाईल आणि वाल्मीक नगर येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला झाल्याच्या घटना ताज्या असताना आता ही घटना घडली. या घटना वारंवार घडत असताना शनिपेठ पोलिसांकडून तातडीने कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गुन्हेगारीला पायबंद कधी?

या घटनांमुळे शनिपेठ परिसरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असून, स्थानिक नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी लक्ष घालून ठोस पावले उचलावीत, अशी स्थानिकांची मागणी आहे.

शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तिसरी धक्कादायक घटना

शनिपेठ पोलीस स्टेशन च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कुठलाही वाचक गुन्हेगारांमध्ये राहिला नसल्याने या तिसऱ्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि तेथील गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी यांनी याबाबत कुठलीही तात्काळ कारवाई न केल्यामुळे असले प्रकार घडत आहेत,

सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर इतर समाजाच्या लोकांनी अशा रीतीने मशीद आणि इतर भागांमध्ये दहशत पसरवून नागरिकांमध्ये धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून शांतता आणि सुव्यवस्था कायम राखावी असे अपेक्षा येथील नागरिकांमधून होत आहे, तरुणांवर होणाऱ्या हल्ल्याच्या या तिसऱ्या घटनेमुळे गेल्या दहा दिवसात घडल्या आहेत अद्यापही शनिपेठ पोलिसांनाही या आरोपींचा शोध लावण्यात अपयश आले आहे याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह एलसीबीने कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button