
कुणाल कामरावर गुन्हा दाखल करावा
शिवसेनेची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
जळगाव प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने स्टैंडअप कॉमेडीच्या माध्यमातून अपशब्द वापरले आहेत. अशा व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
या वेळी महानगरप्रमुख संतोष पाटील, शहर प्रमुख कुंदन काळे, शहर प्रमुख गणेश सोनवणे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.