ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा उड्डाणपुलाजवळ अपघात; चार जखमी
ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा उड्डाणपुलाजवळ अपघात; चार जखमी
चार ते पाच दुचाकी आणि रिक्षा चिरडल्या
जळगाव – मालधक्क्यावरून सिमेंट लोड करून शिवाजी नगर उड्डाणपुलावरून जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उतारावरून मागे जात रिव्हर्स येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला धडकला. यामुळे उड्डाणपुलाशेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षा आणि चार ते पाच दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ही घटना शनिवारी (दि. २२) दुपारी अडीच वाजता शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली.
सुरत रेल्वेगेटजवळील मालधक्क्यावरून सिमेंट लोड करून (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजीनगर उड्डाणपुलावर जात असताना अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रक रिव्हर्स येत रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला जाऊन आदळला.
चार जण गंभीर जखमी
या अपघातात राधाकृष्ण नगरातील रहिवासी सुरेश ओस्वाल (वय ५०) यांना ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच, वरणगाव (ता. भुसावळ) येथील रुपेश गोपाल चौधरी (वय ४३), आशा बानो आणि अन्य दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.