इतर

कौटुंबिक हिंसाचार:’ किरकोळ भांडणातून पतीने पत्नीला टाटा नेक्सॉन गाडीखाली चिरडले

कौटुंबिक हिंसाचार:’ किरकोळ भांडणातून पतीने    पत्नीला टाटा नेक्सॉन गाडीखाली चिरडले

भडगाव ;-  भडगाव शहरातील पेठ भागात किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. पाचोरा येथील पतीने आपल्या ३२ वर्षीय पत्नीवर टाटा नेक्सॉन गाडी चालवून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्या संपूर्ण शरीरावरील कातडे फाटले आहे. ही घटना १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तृप्ती रेवण पवार (वय ३२, रा. पेठ, भडगाव, धंदा: गृहिणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रेवण प्रमोद पवार (रा. पाचोरा) याने त्यांच्या बहिणीला (प्रियदर्शनी पाटील) शिवीगाळ आणि मारहाण केली. यानंतर त्याने त्यांच्या मुलीला (गार्गी) घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तृप्ती यांनी पतीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि उद्या सकाळी येण्याचे सांगितले. मात्र, यामुळे संतापलेल्या रेवण याने मुलीला जोरजबरदस्तीने ओढत नेले. यावेळी तृप्ती यांची आई आणि बहिण मुलीला सोडवण्यासाठी पुढे आल्या. याचा राग आल्याने रेवण याने आपली टाटा नेक्सॉन गाडी चालू करून तृप्ती यांच्यावर गाडी चढवली. एवढेच नाही, तर त्याने गाडी पुढे-मागे करून तृप्ती यांना फरफटत नेले, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ही घटना इतकी भयानक होती की, ती पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. तृप्ती यांच्या शरीरावरील कातडे फाटले असून त्या गंभीर अवस्थेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये रेवण प्रमोद पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९, १९५(२), आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.र.नं. २२१/२०२५). पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के करत आहेत.

ही घटना भडगाव शहरात चर्चेचा विषय बनली आहे. कौटुंबिक वादातून अशा प्रकारची हिंसक कृती घडणे हे समाजासाठी चिंतेचे कारण आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.पुढील तपास:पोलिसांनी आरोपी रेवण पवार याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, तृप्ती यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button