खान्देशगुन्हेजळगांव

भुसावळ रेल्वे स्टेशनवर १ कोटींच्या बनावट नोटांसह एकाला अटक

भुसावळ रेल्वे स्टेशनवर १ कोटींच्या बनावट नोटांसह एकाला अटक

भुसावळ :- भुसावळ रेल्वे स्थानकावर एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांचा साठा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी या नोटा संशयिताच्या सामानातून जप्त केल्या असून, एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मलकापूरहून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांचे लक्ष गेले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता, त्यात बनावट नोटांचा मोठा साठा आढळून आला. यावेळी एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली.

तपासात असे समोर आले की, सामानातील 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरची नोट खरी होती, परंतु खालच्या सर्व नोटांवर ‘चिल्ड्रन बँक’ असे लिहिलेले होते, ज्यामुळे त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सतर्कता वाढवली असून, तपास वेगाने सुरू आहे.

रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षेची पावले उचलली असून, अटकेतील संशयिताची कसून चौकशी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button