खान्देशगुन्हेजळगांव

घरफोडी प्रकरणी दोन आरोपींना अटक, २० ग्रॅम सोने हस्तगत

घरफोडी प्रकरणी दोन आरोपींना अटक, २० ग्रॅम सोने हस्तगत

जळगाव- शहरातील रामनगर येथे दि. १५ ते १७ मार्च दरम्यान घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन आरोपींना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

रामनगर येथील ऋषीकेश दिलीप येवले यांच्या राहत्या घराचा कडी-कोडा तोडून अज्ञात चोरट्यांनी १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या चोरी केल्या होत्या. यासंदर्भात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक (रा. उमर कॉलनी, जळगाव) याने केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दि. १ एप्रिल रोजी आरोपीला उमर कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम (रा. अली मशीद समोर, हुडको पिंप्राळा, जळगाव) सोबत केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत २० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहा. फौजदार राजेश मेढे, रवि नरवाडे, अतुल वंजारी, पो. हे. का. प्रविण भालेराव, विजय पाटील, हरीलाल पाटील, महेश पाटील, सागर पाटील आणि चालक प्रमोद ठाकुर यांनी केली. आरोपी अबरार उर्फ चिरक्या खाटिक याच्यावर यापूर्वीही चार गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button