खान्देशगुन्हेजळगांव

एमआयडीसीत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक ; ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

एमआयडीसीत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक ; ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव | प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर मध्ये झालेल्या घरफोडीचा छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला तांब्याच्या तारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

जगवानी नगर परिसरातील गेट समोर असलेल्या दुकान नंबर चार मधून अज्ञात चोरट्यांनी रात्री साडेचारच्या सुमारास शटर व चैनल गेट तोडून दुकानात प्रवेश करून सुमारे १,८५,००० रुपयांचा तांब्याचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार राहुल घेटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रितेश संतोष आसेरी (४६, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचा साथीदार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (३२) याला देखील रामानंदनगर परिसरातून पाठलाग करून अटक करण्यात आली.

पोलिसांनी दोघा आरोपींकडून १०० किलो वजनाचे जुने व नवीन तांब्याचे तार, अंदाजे ५४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी चोरलेला उर्वरित मुद्देमाल कोठे विकला याचा तपास सुरू आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.उ.नि. राहुल तायडे, पो.हे.काँ. गणेश शिरसाळे, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार विजयसिंह पाटील, रवी नरपाळे, अक्रम शेख यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button