खान्देशगुन्हेजळगांव

३४ वर्षीय तरुणाला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी अटक

३४ वर्षीय तरुणाला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी अटक

जळगाव : तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या वसीम निसार शहा (वय ३४, रा. तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक केली. त्याला जळगावात आणण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

वसीम हा वापी येथे पळून गेला होता, परंतु जळगावातील संपर्कांमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.३ मे रोजी शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना तांबापुरा परिसरातील एका तरुणाने मुलीचे अपहरण केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल इम्रान बेग यांनी तांत्रिक माहिती आणि संशयिताच्या संपर्कांचा मागोवा घेतला. वसीम हा मुलीसह वापी येथे असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला आणि मुलीला सुरत येथून ताब्यात घेतले. बुधवारी, १४ मे रोजी दोघांना जळगावात आणण्यात आले. वसीमविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button