गुन्हे

१८ आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धिक्कार मोर्चा

जळगाव l ४ ऑगस्ट २०२३ l रोजी मणिपूर राज्यात आदिवासी महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व जबाबदार गुन्हेगारांसह तेथील प्रशासनावर त्वरित कारवाईच्या मागणी साठी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धिक्कार मोर्चा आयोजित केला गेला तसेच खड्के येथील वसतिगृहातील मुलींना न्याय मिळावा व भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या निर्घृण खून करणाऱ्याला फाशी द्या या मागणी साठी भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्च्यांत लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे, जन क्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळ, आदिवासी टायगर संघटनेचे पंढरीनाथ मोरे, आदिवासी एकता परिषदेचे करण सोनवणे, जया सोनवणे, भिल्ल समाज विकास मंच चे दिपक अहिरे, आदिवासी एकता मंच चे सरदार तडवी, एकलव्य संघटनेचे सिताराम सोनवणे, एकलव्य लोक संग्राम चे अरुण मोरे , भिल्लवंश संघटनेचे राणा शबरीमाता भिल्ल आदिवासी संस्थेचे प्रदीप अहिरे, आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच चे एम बी तडवी, आदिवासी भिल्ल तडवी महिला मंच च्या छाया तडवी, राजपुत्र एकलव्य संघटनेचे राज साळवे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सुषमा भालेराव या सर्वांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्यात हजारो संख्येने आदिवासी महिला पुरुष सहभागी झाले होते.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू झाला व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेथे त्याचे सभेत रूपांतर झाले.

या वेळी सर्वच वक्त्यांनी मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून तेथील आदिवासी समूहांना त्यांच्या नैसर्गिक संसाधानांवरून हुसकावून त्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करत भीषण अत्याचार सुरु आहेत या देशात गेल्या काही काळात आदिवासी सामुहांवरील अत्याचार वाढतच आहेत. या विषयी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत राष्ट्रपतींनी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली या वेळी बोलतांना प्रतिभाताई यांनी सांगितले की मणिपूर हिंसाचाराचे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. कारण केंद्र सरकारला तेथील खनिजे व जंगले बळकवायची आहेत त्यासाठी मणिपूर हिंसाचारात जळत असतांना दिल्लीत संसदेत त्यावर उत्तर द्यायला सरकार तयार नाही मात्र त्याच वेळी निर्लज्जपणे बहुमताच्या आधारावर कुठलीच चर्चा न करता पर्यावरणाचा विनाश करणारे व आदिवासींचे पेसा व वन हक्क कायदा बाद ठरवणारे वनसंरक्षण सुधारणा विधेयक २०२३ पास करण्यात आले आहे हा येथील आदिवासींच्या नैसर्गिक संसाधनांवरील मोठा हल्ला असून आता येथील आदिवासी समूह शांत बसणार नाही.

आपल्या जिल्ह्यात ही एरंडोल तालुक्यातील खडके येथील आदिवासी मुलींवर झालेला अत्याचार असेल किंवा भडगांव तालुक्यातील एका ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची केलेली निर्घृण हत्या असेल यांना ही न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री प्रवीण महाजन यांनी आदिवासी महिला प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले व ते राष्ट्रपतीं पर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले.

मोर्चाची सांगता करतांना ९ ऑगस्ट या विश्व आदिवासी दिन साजरा करतांना मणिपूर घटनेचा निषेध ही प्रत्येक आदिवासी गावात केला जाऊन त्या दिवशी आदिवासींचा जाहीरनामा घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला
मोर्च्यांच्या आयोजनात लोकसंघर्ष चे सचिनभाऊ धांडे , भरात कार्डिले, आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button