जळगाव प्रतिनिधी:-गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुण विक्रेत्या ला चौघांनी आधी कोयत्याचा धाक दाखवत दोन हजारांची रोकड हिसकावून नंतर विक्रेत्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील खोटे नगर स्टॉप परिसरात चार रोजी सायंकाळी घडली. याबाबत चौघांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटे नगर परिसरात 28 वर्षीय गौतम हकीमचंद यादव हा तरुण पाणीपुरीचा खोटे नगर स्टॉप जवळ व्यवसाय करतो. 4 रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरी विक्री करण्यासाठी उभा असताना बुलेट वरून आलेले संशयित
गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील सर्व रा. जळगाव या पैकी दादू कोळी याने लोखंडी कोयता काढून गौतम यादव याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडून जबरदस्तीने दोन हजार रुपये हिसकावले. मात्र एवढ्यावर न थांबता या चौकडीने लाकडी दांडक्याने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी गौतम यादव याने त्या ठिकाणावरून पळ काढला असताना चौघांनी त्याचा कोयता घेऊन पाठलाग करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .
याप्रकरणी गौतमने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्या वरून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.