शालेय मनपास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय विजयी
जळगाव l ५ ऑगस्ट २०२३ l जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे झालेल्या 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट2023 दरम्यान सुब्रतो फुटबॉल स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी झाला. अंतिम सामन्यांमध्ये गोदावरी स्कूलच्या दोन शून्याने पराभव केला या स्पर्धेमध्ये कृष्णा साहित्य याने उत्कृष्ट दोन गोल केले.
खेळाडू कर्णधार कैवल्य खैरनार, निलेश राजभर, कार्तिक सोमानी, रचित चौधरी, प्रेम कुमार गुप्ता ,सौरभ बोस ,कुंदन वाणी ,स्वास्तिक परमार, अनिकेत सुरवाडे, कृष्णा साहित्य ,अली अश्फाक शेख, अजय गायकवाड, यश बोथरा, राहुल यादव यांनी सहभाग नोंदवला.
मार्गदर्शन क्रीडा शिक्षक, प्रा.डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
के.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, के.सी.ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, के सी ई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स .ना .भारंबे, उपप्राचार्य के. जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर. बी. ठाकरे, .प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर क्रीडा संचालक,मू जे महाविद्यालय, जिमखाना समिती चेअरमन प्रा शिल्पा सरोदे , समन्वयक प्रा स्वाती बराटे प्रा प्रसाद देसाई, प्रा उमेश पाटील यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.