मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील उपक्रम
जळगाव l ५ ऑगस्ट २०२३ l मैत्रीदिनानिमीत्त विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडांशी मैत्री व्हावी म्हणून मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झाडांचे महत्व शिक्षकांनी सांगितले. यावेळी वाजतगाजत वृक्षदिंडी देखील काढण्यात आली.
सर्वांसाठी फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिनानिमित्त विद्यार्थ्यांना झाडाशी मैत्री व्हावी म्हणून फ्रेंडशिप दिनी आम्ही विद्यार्थ्यांकडून संकल्प करण्यात आला. पुढल्या फ्रेंडशिप डे येईपर्यंत वर्षभराच्या काळात पर्यावरणाचा विचार करता शाळेच्या परिसरातवृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांना लावून त्यांचे संगोपन सुद्धा करणार आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. औषधी झाडे, फुले फळांची झाडे, सावली देणारे वड, साग, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर यासारखे वृक्ष लावण्यात आले.
यावेळी परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षांचे महत्व सांगत परिसर पर्यावरणमय केले. यानंतर मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व सांगितले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.