इतर

फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांचा मनपाविरोधात उद्या ‘बंद’ आंदोलन; अन्यायकारक कर आणि अतिक्रमण कारवाईला विरोध

फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांचा मनपाविरोधात उद्या ‘बंद’ आंदोलन; अन्यायकारक कर आणि अतिक्रमण कारवाईला विरोध

जळगाव | महात्मा फुले मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या अन्यायकारक निर्णयांविरोधात उद्या शुक्रवार, ३० मे रोजी ‘बंद’ आंदोलन पुकारले आहे. सकाळी १०:३० वाजता व्यापाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याजवळील नूतन ड्रायफ्रुट्ससमोर एकत्र जमून तेथून शांततेत रांगेने महापालिका कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फुले मार्केट, फुले मार्केट पहिला माळा आणि सेंट्रल फुले मार्केट येथील व्यापारी महापालिकेने आकारलेल्या ७% रस्त्यावरचा गाडे भाडे कर आणि अतिक्रमणावरील कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

मोर्चादरम्यान महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून, त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर व्यापारी आपल्या अडचणी व मागण्या मांडणार आहेत. त्यानंतर स्थानिक आमदार  आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर व्यापारी आपले व्यवहार सुरळीत सुरू करतील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान सर्व व्यापाऱ्यांनी काळ्या कपड्यांमध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून एकसंघ विरोधाचा स्पष्ट संदेश जाऊ शकेल, असे आवाहन फुले मार्केट असोसिएशन, फुले मार्केट पहिला माळा असोसिएशन आणि सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनने केले आहे.

“व्यापारी एकता जिंदाबाद!” असा नारा देत व्यापाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button