रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केले तब्बल ११ कोटी रुपये

रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केले तब्बल ११ कोटी रुपये
भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेने मे महिन्यात विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठी मोहीम राबवत तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे,
रेल्वे स्थानकांपासून ते धावत्या गाड्यांपर्यंत तपासणी करण्यात आली आणि तब्बल १ लाख १८ हजार प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. यातून ७०,३२९ बिनतिकीट प्रवाशांकडून ८.०५ कोटी रुपये आणि ४८,३६७ अनियमित प्रवाशांकडून ३.१३ कोटी रुपये असा मोठा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वेच्या तपासणी मोहिमेत १०१ माल प्रवाशांकडून अनधिकृत सामान देखील जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई डीआरएम इती पांडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक पी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना “विना तिकीट प्रवास करू नका, वैध तिकीट घेऊनच प्रवास करा आणि नियमांचे पालन करा,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.