जळगाव ;- बालाजी नमकीनच्या गोडावून मधून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल करून चोरून नेल्याचा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता शहरातील नेहरू नगरातील दत्तमंदीराजवळ उघडकीस आला असून याप्रकरणी मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एकावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , वैशाली दिनेश वाणी (वय-४२) रा. मोहन नगर, मोहाडीरोड, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बालाजी नमकीनचा व्यवसाय असून त्यांचे नेहरू नगरातील दत्त मंदीराजवळ गोडावून आहे. ६ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर रोजीच्या दरम्यान संशयित आरोपी सचिन मुकुंदा साळवे (रा. खंडेराव नगर, जळगाव) याने गोडावूनमधून सुमारे १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर १० दिवसांनी मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला संशयिताविरुद्ध तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सचिन मुकुंदा साळवे (रा. खंडेराव नगर, जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहे.