अजित पवार हे शब्दाचे पक्के ,त्यांनी मतदार संघासाठी रुपयाही दिला नाही -गिरीश महाजन
मुंबई ;- गेल्या वीस वर्षांपासून अजित पवार आणि माझा एकमेकांना विरोध राहिला आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा देणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यांनी हे आव्हान आणि शब्द पाळला. आम्ही आता मित्र झालो आहोत. आज ते माझं कौतुक करत होते, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज बोलताना दिली.पुण्यात आरोग्य शिबीराच्या निमित्ताने अजित पवारांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसची स्तुती केली.
ते म्हणाले कि, अजित पवारांनी फिटनेसचं कौतुक केल्याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले, “आज मैत्रीदिवस आहे. अजित पवार आणि माझा सुरुवातीपासून एकमेकांना राजकीय विरोध होता. अजित पवारांनी वीस वर्षांच्या कार्यकाळात माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नव्हता. त्यांनी मला आव्हान दिलं होतं की, तुझ्या मतदारसंघात एक रुपयाही देणार नाही. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. कारण अजित पवार शब्दाचे पक्के आहेत.
अजित पवार जेव्हा मला भेटतात, तेव्हा ते नेहमी माझे बायसेप (दंड) बघतात आणि विचारतात, हे कसं केलं? मी त्यांना सांगतो, की दादा रोज व्यायाम केला पाहिजे. मी रोज एक तास जिममध्ये जातो. खाण्या-पिण्यावर माझे खूप निर्बंध आहेत. मी तळलेले पदार्थ कधीच खात नाही. मी हॉटेलमध्ये कधीच जेवत नाही. प्रवासात असलो तरी मी घरचं जेवण जेवतो. मी एखाद्या कार्यकर्त्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून पोळी-भाजीचा डब्बा मागवून घेतो आणि गाडीतच जेवतो. पण मी बाहेरचं खात नाही. केवळ राजकारणी लोकानीच नव्हे तर प्रत्येकानं या गोष्टी पाळल्या पाहिजेत. प्रत्येकानं आपलं आरोग्य जोपासलं पाहिजे,” असंही गिरीश महाजन पुढे म्हणाले.