इतर

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला विकासासाठी नवे पाऊल; नृत्यकलेच्या प्रसाराला चालना

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला विकासासाठी नवे पाऊल; नृत्यकलेच्या प्रसाराला चालना

जळगाव:– (फैज़ान शेख) मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

शाळेच्या वतीने ‘Step Up Dance Class’ ची सुरूवात करण्यात आली असून, उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे सर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर कलागुणांचे जतन व संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

नृत्य ही एक सर्जनशील व प्रेरणादायक कला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या डान्स क्लासचे मार्गदर्शन कुमारी गौरी जगताप करत असून, त्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले.
त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना या संधीचा योग्य उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास भाऊसाहेब जगताप तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button