इतर

रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी जितेंद्र बरडे, सचिव ॲड. केतन ढाके — नूतन कार्यकारिणी जाहीर; रविवारी पदग्रहण सोहळा

रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी जितेंद्र बरडे, सचिव ॲड. केतन ढाके — नूतन कार्यकारिणी जाहीर; रविवारी पदग्रहण सोहळा

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या २०२५-२६ या रोटरी वर्षासाठी अध्यक्षपदी जितेंद्र बरडे यांची, तर मानद सचिवपदी ॲड. केतन ढाके यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार, २७ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता गणपती नगरातील रोटरी हॉल येथे पार पडणार आहे.

या प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या माजी प्रांतपाल मंजू फडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, सहप्रांतपाल सचिन जेठवाणी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

नूतन कार्यकारिणी घोषित

रोटरी सेंट्रलच्या नव्या कार्यकारिणीत पुढील सदस्यांचा समावेश आहे –
कोषाध्यक्ष: दीपक नाथानी
आयपीपी: दिनेश थोरात
सार्जंट ॲट आर्म्स: विनोद बलदवा

संचालक:
डॉ. नरेंद्र जैन, महेंद्र रायसोनी, सी.ए. अनिल शाह, श्यामकांत वाणी, ॲड. श्रीओम अग्रवाल, शिरीष भिरुड, विष्णू भंगाळे, डॉ. राहुल मयूर, डॉ. अपर्णा भट-कासार, विपुल पारेख, मिलन मेहता, कल्पेश दोशी, डॉ. राजेश जैन, कल्पेश शाह, रवींद्र वाणी, महेंद्र गांधी, डॉ. प्रीती पाटील, श्यामलाल कुकरेजा.

नव्या कार्यकारिणीला रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button