कथित रेव्ह पार्टी प्रकरण – डॉ. प्रांजल खेवलकर यांना जामीन, खडसे कुटुंबास दिलासा

कथित रेव्ह पार्टी प्रकरण – डॉ. प्रांजल खेवलकर यांना जामीन, खडसे कुटुंबास दिलासा
पुणे : कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे खराडी परिसरात अटक केलेल्या डॉ. प्रांजल खेवलकर यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खेवलकर हे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत.
या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अटक झाल्यानंतर खेवलकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते, त्यात काही महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रण आढळल्याचा दावा देखील समोर आला. या प्रकरणावर भाजप नेत्यांनी आमदार खडसे यांच्यावर टीका केली होती, तर खडसे व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिले होते.
सुरुवातीला खेवलकरांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला नव्हता, मात्र अलीकडे त्यांनी अर्ज दाखल केला. आज न्यायालयीन सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. यामुळे आमदार एकनाथ खडसे, रोहिणी खडसे आणि खडसे–खेवलकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.





