जळगांव

वेळोदेच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला, रोहित निकम यांचा मदतीचा हात!

खान्देश टाइम्स न्यूज | ९ ऑगस्ट २०२३ | चोपडा तालुक्यातील मौजे वेळोदे येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचा नुकतेच अपघाती मृत्यू झाला. भोई कुटुंबावर अचानक झालेल्या आघाताने ते खचले असताना जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांनी मदतीचा हात दिला आहे.

चोपडा तालुक्यातील मौजे वेळोदे येथील गरीब कुटुंबातील करता करविता शालेय विद्यार्थी अमोल भोई हा वन विभागाच्या परीक्षेचे हाॅल तिकिट घेण्यासाठी जात असता त्याच्यावर काळाने झडप घातली. कुटुंबाचा आधार असलेला अमोल अचानक निघून गेल्याने भोई कुटुंबावर मोठा आघात झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांनी स्वर्गीय अमोलच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सात्वंतपर भेट घेतली. सर्वांशी चर्चा करीत त्यांनी परिस्थितीची विचारणा केली. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याची उणीव भरणे शक्य नसले तरी रोहित निकम यांनी अमोलच्या आईवडीलांना आर्थिक मदतीचा आधार म्हणून एक लाख रूपये मदतीचा हात दिला.

स्वर्गीय अमोल यांच्या कुटुंबाचे सात्वंन करण्यासाठी जिल्हा दूध संघाचे संचालक रोहीत निकम, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज पाटील, चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे, जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन, चिटणीस भरत सोनगिरे, चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button