इतरजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

राज्यात ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर

राज्यात ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर

पीक कर्जावर २ लाखांपर्यंत माफी; नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button