इतर

विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी सजली अभ्यास जत्रा

विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी सजली अभ्यास जत्रा

जळगाव  प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये “अभ्यास जत्रा” हा अनोखा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमांतर्गत विविध शैक्षणिक साहित्याची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितली यामध्ये “द थर्स्टी क्रो” , पुंगी वाल्याची गोष्ट, शेतीची माहिती, यात्रेची माहिती अशा विविध प्रकारचे शालेय शैक्षणिक साहित्य ठेवले गेले होते आणि जवळजवळ शंभर ते दीडशे पालकांसमोर विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक साहित्याची माहिती सांगितली. यामध्ये सीनियर बालवाडी सत्यम, शिवम, सुंदरम तीनही गटातील विद्यार्थी सहभागी होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून के. सी. ई. सोसायटीचे रेडिओ मनभावन संचालक अमोल देशमुख उपस्थित होते.

पाहुण्यांसोबत पालकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि योग्य उत्तरे त्यांना मिळाली पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे उपस्थित होत्या . सूत्रसंचालन सौ रत्नप्रभा नेमाडे यांनी केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button