
घरफोडी करणारे तीन अट्टल चोर जेरबंद ;जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
राजमालतीनगरमधील चोरीचा छडा; ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील राजमालतीनगर भागात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला (DB) यश आले आहे. याप्रकरणी तीन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसरातील रहिवासी संजू बिस्मिल्ला पटेल यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ३२ हजार रुपये किमतीची ‘चिलर मशीन’ आणि ३० हजार रुपये किमतीचा ‘५ एच.पी.चा पाण्याचा मोटार पंप’ असा मुद्देमाल लांबवला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ९१/२०२६) दाखल करण्यात आला होता.
अशी झाली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी माहिती घेत असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचला.
याप्रकरणी नासिर निसार शेख (वय १९, रा. राजमालतीनगर, जळगाव) याला पाळधी येथून ताब्यात घेतले.कार्तिक संजय मोरे (वय २१, रा. नवीपेठ, जळगाव).युवराज रमेश गुरचवडे (वय १९, रा. बुलढाणा, ह.मु. गणेशनगर, जळगाव).या तिघांना अटक केली आहे.
आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपास पथक
ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक अशोक खेडकर, सुनील पाटील, फकिरा रंधे, उमेश भांडारकर, सतीश पाटील, दीपक शिरसाठ, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार यांच्या पथकाने केली.




