खान्देशगुन्हेजळगांव

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस जाळ्यात 

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस जाळ्यात 

जळगाव एसीबीची कारवाई

जळगाव : प्रतिनिधी — शनिपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने तब्बल २ लाख रुपयांची मागणी केली होती.

या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर १३ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार तक्रारदार शनिपेठ पोलीस ठाण्याबाहेर पोहोचला असता आरोपी विनोद अहिरे यांनी १ लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, कर्मचारी संगीता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी आदींचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button