खान्देशजळगांव

भुसावळात १९ किलो गांजा जप्त; चौघांविरुद्ध एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

भुसावळात १९ किलो गांजा जप्त; चौघांविरुद्ध एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

ताजनगर परिसरात पोलिसांची धाड; दोन आरोपी ताब्यात, दोघांचा शोध सुरू

भुसावळ : शहरातील ताजनगर परिसरात बाजारपेठ पोलिसांनी धाड टाकत तब्बल १९ किलो १७२ ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी चौघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ४ लाख ३१ हजार ४४० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोपनीय माहितीवरून कारवा

१४ मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास ताजनगर, शाळा क्रमांक ३ जवळील नवबी वाडा परिसरात काही जण गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी धाड टाकली.

दोन आरोपी ताब्यात, दोघे फरार

या कारवाईत शेख अजिज अब्दुल मजीद उर्फ अच्छू (वय ४२, रा. ताजनगर, भुसावळ) आणि त्याचा साथीदार मोठा भाऊर सलीम मजीद शेख (वय ४५, रा. ताजनगर, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले. तर अनस (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) आणि आदिल खान (रा. सिंधी वस्ती, अकोला) हे दोघे संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१९ किलो गांजा जप्त

झडतीदरम्यान हिरवट रंगाचे पाने, फुले, बिया आणि काड्या असलेला गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. दोन गोण्या भरून ठेवलेला हा गांजा “PARAG AGRO” असे लिहिलेल्या पोत्यांमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी एकूण १९ किलो १७२ ग्रॅम गांजा जप्त केला.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ख), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश जाधव करीत आहेत.

“शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे,” असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button