खान्देशजळगांवराजकीयसामाजिक

ना.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूद येथे मोफत मोतीबिंदू शिबिर

ना.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूद येथे मोफत मोतीबिंदू शिबिर

आमदार अमोलभाऊ जावळे मित्र परिवाराचा उपक्रम

प्रतिनिधी I यावल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जनसामान्यांचे संकटमोचक मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी अकलूद, ता. यावल येथे “मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान” या जनहित उपक्रमाचे आयोजन आमदार अमोलभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

साई बाबा मंदिर, अकलूद येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत होणाऱ्या या शिबिरामध्ये गरजू रुग्णांची प्राथमिक नेत्र तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

समाजातील ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये आरोग्यविषयक उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

आरोग्यसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेतून सातत्याने होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. तरी परिसरातील गरजू रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button