आदिवासी एकता मंचाचा यावलमध्ये वार्षिक मेळावा उत्साहात; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

आदिवासी एकता मंचाचा यावलमध्ये वार्षिक मेळावा उत्साहात; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
महिला सशक्तीकरण, समाजावरील अन्यायाविरोधातील लढा आणि महापंचायतीसाठी उपस्थितीचा ठराव
यावल, प्रतिनिधी : आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित वार्षिक मेळावा १५ मे २०२६ रोजी यावल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राज्याध्यक्षांच्या हस्ते महामानव बिरसा मुंडा, क्रांतिवीर तंट्या मामा भिल तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून यावलचे नगरसेवक रुबाब आप्पा तडवी तसेच रत्नागिरी येथील रशीद तडवी सर उपस्थित होते. यावेळी मंचावर राज्य उपाध्यक्ष सलीम भूरेखा तडवी, राज्य सदस्य समीर गुलशेर तडवी, जिल्हाध्यक्ष मेहरबान भाऊ तडवी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सत्तार भाई केदारे, मौलाना जावेद, जिल्हा सल्लागार इस्माईल तडवी सर न्हावी, महिला जिल्हाध्यक्ष मुन्नाताई तडवी, जिल्हा उपाध्यक्ष सब्दल भाऊ तडवी व फरीद भाऊ तडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेत आदिवासी समाजावर होणारे अन्याय, अत्याचार तसेच विविध घटनांमध्ये संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा जळगाव, बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मांडला. महिला सशक्तीकरणासाठी विशेष महिला बैठकीचे आयोजन करण्यात आले असून समाजकार्यात सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या महिलांना संघटनेत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी विविध पदांवर नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. मेहरबान तडवी यांची यावल तालुका सक्रिय सदस्यपदी, युनूस सायबु तडवी (नायगाव) यांची मराठवाडा विभाग प्रमुख तथा जळगाव जिल्हा सल्लागारपदी, अशपाक भाऊ तडवी यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच मोहरद येथील उपसरपंच व पत्रकार मन्सूर दादा तडवी यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कलीम तडवी यांची जिल्हा उपप्रसिद्धी प्रमुख, युनुस मयताब तडवी (सावदा) यांची जिल्हा सदस्य, तर यासीन सुभान परसाळे यांची यावल तालुका सचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
रुबाब निजाम वड्री यांची तालुका सदस्य, सुपडू इस्माईल सांगवी यांची तालुका सहसचिव, जुम्मा गंभीर बोरखेडा, खलील रमजान बिडगाव व निसार रशीद यांची चोपडा तालुका सदस्यपदी निवड करण्यात आली. महिला आघाडीत समीनाताई फिरोज तडवी न्हावी यांची जिल्हा सचिवपदी, तर भालोद येथील समीना ताई फिरोज यांची यावल तालुका महिला सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. सर्व नियुक्त्या बिनविरोध करण्यात आल्या असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
१७ मे रोजी होणाऱ्या महापंचायतीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
तसेच आगामी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सभेचा लेखाजोखा जिल्हा सचिव फत्तू भाऊ तडवी यांनी मांडला. कार्यक्रमाला जिल्हा सहसचिव जुम्मा भाऊ तडवी, जिल्हा संघटक रब्बील भाऊ तडवी, कर्मचारी संघटनेचे प्रकल्प अध्यक्ष दस्तगीर तडवी, जिल्हा उपाध्यक्ष संजू भाऊ तडवी, यावल तालुका उपाध्यक्ष फिरोज भाऊ तडवी, रावेर तालुका उपाध्यक्ष रियाज भाऊ तडवी, जहांगीर भाऊ तडवी, राजू तडवी, निलेश तडवी, शाहरुख भाऊ तडवी, बिल्ला दादा तडवी, अमित तडवी, रेहानाताई तडवी, साहिल मुसा तडवी, खलील भाऊ तडवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य सदस्य मनेष तडवी सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार यावल तालुका अध्यक्ष युसुफ भाई तडवी यांनी मानले. कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या राज्य सचिव इब्राहिम तडवी सर यांनी शुभेच्छा संदेश पाठवला.





