खान्देशगुन्हेजळगांव

ट्रॅक्टर चोरट्यांच्या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश 

ट्रॅक्टर चोरट्यांच्या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश 

दोन गुन्ह्यांची उकल; ३.२५ लाखांचे दोन ट्रॅक्टर जप्त, दोन संशयित ताब्यात

जळगाव : एरंडोल परिसरात ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश करत दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले तब्बल ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.

एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. ४४/२०२६ व गुरनं. ८४/२०२६ असे सलग ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक तयार करून तपासाला वेग दिला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने विखरण (ता. एरंडोल) येथील विकी देवरे व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी हे दोन्ही गुन्हे गणेश भिकन गोसावी आणि प्रविण भाईदास कोळी (दोघे रा. विखरण, ता. एरंडोल) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर जप्त केले असून त्यांची एकूण किंमत ३ लाख २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील फरार असलेल्या अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली PSI जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील, राहुल कोळी, महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार व बाबासाहेब पाटील यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button