खान्देशगुन्हेजळगांव

१२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करणाऱ्या मयत पित्यावर खुनाचा गुन्हा

भडगाव ;- तालुक्यातील शिवनी येथे एका पित्याने १२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करून स्वतःही झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना २९ जुलै २०२३ रोजी शिवणी शिवारातील शेतामध्ये घडली होती सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.. मात्र साक्षीदार यांच्या जबाबावरून मयत पित्यावर खुनाचे कलम वाढवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भडगाव तालुक्यातील शिवनी येथे राव चव्हाण वय 48 यांना त्यांचा १२ वर्षीय मुलगा कौशिक संजय चव्हाण हा पैसे मागत असल्याने व माघारी बोलत असल्याचा राग आल्याने संजय चव्हाण यांनी शेतातील पत्री शेडमध्ये असलेल्या खाटेवर कौशिक याचा गळा दाबून स्वतःही झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 29 जुलै रोजी घडली. या प्रकरणी सुरुवातीला भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र साक्षीदारांच्या जबाबावरून संजय चव्हाण यांनी मुलगा कौशिक चव्हाण यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने मयत संजय चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचे कलम वाढवण्यात येऊन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button