खान्देशगुन्हेजळगांव

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

पहूर, चाळीसगाव, पिंपळगाव हरेश्वरसह विविध ठिकाणी नियुक्त्या; दोघांकडे अतिरिक्त पदभार

जळगाव | प्रतिनिधी

जिल्हा पोलीस दलातील तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि एका पोलीस उपनिरीक्षकाची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंगळवारी (दि. ७ जुलै) जारी केले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बदली आदेशानुसार, पहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संलग्न असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची पुन्हा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पूर्ववत नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, बाहेरील जिल्ह्यातून बदलीवर आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांची पहूर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांची पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

दोघांकडे अतिरिक्त जबाबदारी

दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मानव संसाधन विभागात बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्याकडे एएचटीयू (मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष) प्रभारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

याशिवाय, पोलीस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीएनएस विभागाचे उपनिरीक्षक श्रीकृष्ण पटवर्धन यांच्याकडे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वाचक शाखेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

पोलीस दलातील कामकाज अधिक प्रभावी व सुरळीत करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button