खान्देशगुन्हेजळगांव

सावदा पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ४९ हजारांचे गहाळ मोबाईल हस्तगत

सावदा पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ४९ हजारांचे गहाळ मोबाईल हस्तगत

सावदा | प्रतिनिधी : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले व गहाळ झालेले विविध कंपन्यांचे तब्बल १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत केले आहेत. या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

सावदा पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याबाबत दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी गहाळ नोंदवहीतील मोबाईलची माहिती संकलित केली. त्यानंतर CEIR (Central Equipment Identity Register) या ऑनलाइन पोर्टलवर संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक टाकून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या माध्यमातून भुसावळ, जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून गहाळ मोबाईल शोधून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विलास कोळी (वाघोदा खु.) यांचा २० हजार रुपयांचा VIVO, कमलाकर पाटील (रोझोदा) यांचा २० हजार रुपयांचा Realme, विनोद जगन्नाथ वाघ (वाघोदा बु.) यांचा १२ हजार रुपयांचा Redmi, शेख फरहान शेख इरफान (फैजपूर) यांचा १२ हजार रुपयांचा VIVO आणि प्रशांत जावळे (कळमोदा) यांचा १० हजार रुपयांचा Motorola मोबाईलचा समावेश आहे.

याशिवाय मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या ‘प्रॉपर्टी मिसिंग’मधील १५ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल तसेच ६० हजार रुपये किमतीचे दोन iPhone देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड, पोहेकॉ मोहसीन पठाण, पोहेकॉ विनोद तडवी, पोहेकॉ झाकीर मन्सूरी आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज तडवी यांनी मोबाईल शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.गहाळ मोबाईल परत मिळवून देण्यासाठी तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर करत सावदा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button