
भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी
जळगाव (प्रतिनिधी): आदिवासी समाजाचे आराध्य दैवत व महान क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती आज १५ नोव्हेंबर (रविवार) रोजी भाजप कार्यालय, जी.एम. फाउंडेशन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. माजी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते हा सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आणि त्यांच्या संघर्षावर उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, एसटी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक कोळी, संतोष इंगळे, उदयजी भालेराव, दीपक परदेशी, पितांबर भावसार, महेश चौधरी, नगरसेविका वैशालीताई पाटील, सागर पाटील, प्रमोद वाणी, चेतन शर्मा, खंबायत यांच्यासह एसटी मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




