

ईद-ए-मिलाद निमित्त जळगावात भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर
जळगाव | प्रतिनिधी : पैगंबर हजरत मोहम्मद (स्व.) यांच्या जयंती दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘ईद-ए-मिलाद’च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील तांबापूर परिसरात भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अ. हमीद चौक, तांबापूर, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे तसेच मोफत नेत्र तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन डॉ. अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजक नदीम अ. गफ्फार मलिक (कार्याध्यक्ष, जळगाव रा. काँ. पा.) असून, शे. आसीफ शे. अनवर यांचेही सहकार्य लाभत आहे.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




