खान्देशजळगांवसामाजिक

राष्ट्रवादीतर्फे ४५ शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान

राष्ट्रवादीतर्फे ४५ शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत सरकारला जाब विचारणार : एकनाथराव खडसे

जळगाव | प्रतिनिधी

शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या वतीने आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यातील ४५ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात हा कार्यक्रम झाला

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार एकनाथराव खडसे होते.

खडसेंचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव

आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या वतीने त्यांचा मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षक दिनानिमित्त ४५ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे-खेवलकर, प्रदेश सरचिटणीस ईजाजभाई मलिक, जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, जिल्हा समन्वयक विकासदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, राजुभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, राष्ट्रवादी युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, राष्ट्रवादी जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, उत्तर महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेशभाऊ बारे, महानगर जिल्हाध्यक्ष रईसभाई खाटीक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, महानगर जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे, जिल्हा उपाध्यक्ष सुमनताई बनसोडे, जिल्हा चिटणीस माधुरी पाटील, शिक्षक आघाडीचे कार्याध्यक्ष पंकज सूर्यवंशी, सरचिटणीस जिया बागवान, सहसरचिटणीस विजय विसपुते, शिक्षक अविनाश सरदार आणि महेश तायडे आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सरकारला जाब विचारणार

आमदार एकनाथराव खडसे यांनी अध्यक्षीय भाषणात युवा पिढी घडविण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाकडून शिक्षकांकडून विविध कामे करून घेतली जातात. असे असताना शिक्षकांना ईटीटीसारखी परीक्षा देण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. शिक्षक नवीन नियुक्त झालेले असोत किंवा २० वर्षांपूर्वी नियुक्त झालेले असोत, सर्वांना अशा परीक्षेला सामोरे जाण्याची सक्ती योग्य नाही, असे खडसे यांनी सांगितले.

याबाबत आगामी विधान परिषद अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येईल. शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच शिक्षक दिनानिमित्त पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांचे मनोगत

कार्यक्रमात रोहिणीताई खडसे-खेवलकर, ईजाजभाई मलिक, भास्करराव काळे, वाय. एस. महाजन आणि मनपा प्रशासन अधिकारी खलील शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण धनगर सर यांनी केले, तर आभार मुस्ताक भिस्ती सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button