इकरा थीम कॉलेज मध्ये ‘मिशन यूपीएससी’ अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन


इकरा थीम कॉलेज मध्ये ‘मिशन यूपीएससी’ अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन
जळगाव: इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरुण, जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत ‘मिशन यूपीएससी’ (Mission UPSC) या विषयावर एका भव्य आणि माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सलार होते. प्रमुख पाहुण्या म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. सुरेखा पालवे उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर डॉ. हारून बशीर, कय्युम शाह, प्रा. इरफान शेख, प्राचार्य डॉ. वकार शेख, उपप्राचार्य डॉ. तनवीर खान आणि उपप्राचार्या डॉ. अंजली कुलकर्णी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मौलाना मुझम्मिल नदवी यांच्या कुराणाच्या पठणाने (तिलावत) झाली. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही उत्तम रीतीने केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. सुरेखा पालवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण आयुष्यात प्रथम आपले ध्येय (टार्गेट) निश्चित केले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी सतत परिश्रम घेतले पाहिजेत.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सलार यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय ठरवून कठोर परिश्रमाने यश मिळवण्याचा सल्ला दिला.
या प्रसंगी डॉ. इरफान शेख यांनी “यूपीएससी (UPSC) म्हणजे काय?” या विषयावर सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्हिडिओ दाखवून त्यांचा उत्साह वाढवला, तर डॉ. हारून बशीर यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या व्यावहारिक पद्धतींवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. चांद खान, प्रा. डॉ युसुफ पटेल, प्रा. डॉ अमीन काझी, प्रा. डॉ इरफान शेख आणि प्रा.डॉ. फिरदोस शेख यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. उमर पठाण, प्रा. मुस्तकिम बागवान, प्रा. रफिक खतिक, प्रा. केतन शिंरतुरे, प्रा. मुदस्सीर, प्रा. मुबश्शिर, डॉ. कहकशां आणि डॉ. शबाना खटीक यांनी विशेष परिश्रम घेतले.
या चर्चासत्रासाठी २०५ विद्यार्थ्यांनी अधिकृत नोंदणी केली होती. कार्यक्रमास कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




