मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रुग्णांसाठी आरओ मशीन व थंड पाण्याची सुविधा


मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रुग्णांसाठी आरओ मशीन व थंड पाण्याची सुविधा
जळगाव : मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने CA सबुरोद्दीन शेख यांच्या वतीने तसेच मुस्तफा खान, डॉ. अमीर, मोहताशिम शेख आणि दानिश खान यांच्या सहकार्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आरओ वॉटर मशीन आणि ८० लिटर क्षमतेचे थंड पाण्याचे वॉटर कूलर उपलब्ध करून देण्यात आले.
या सुविधेचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या मानवतावादी व सेवाभावी उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील सुरक्षा रक्षक तसेच पवन जाधव यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम मानवता, सामाजिक बांधिलकी आणि सेवा भावनेचा आदर्श संदेश देणारा ठरला.
या सामाजिक उपक्रमासाठी CA सबुरोद्दीन शेख तसेच मुस्तफा खान, डॉ. अमीर, मोहताशिम शेख आणि दानिश खान यांचे सर्व स




