इतर

पेट्रोलपंपावर तरुणावर जीवघेणा हल्ला

पेट्रोलपंपावर तरुणावर जीवघेणा हल्ला

चाळीसगाव शहरातील सप्तश्रृंगी नगरमधील प्रथमेश परदेशी हे आपल्या मित्रासह ५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चरण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी गौरव सोनवणे व रितेश राजपूत तेथे आले. कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत त्यांनी प्रथमेश यांना मारहाण केली. त्यानंतर फायटरने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर वार केला.

दरम्यान, भांडण

सोडवण्यासाठी आलेल्या कुलदीप यांनाही दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पुन्हा दिसल्यास हातपाय तोडून टाकण्याची धमकी देत तेथून पसार झाले. या प्रकरणी प्रथमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गौरव सोनवणे व रितेश राजपूत या दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button