इतर

हॉटेलमध्ये जेवताना झालेल्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

हॉटेलमध्ये जेवताना झालेल्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

​जळगाव: हॉटेलमध्ये जेवण करत असताना एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. शिरसोली रस्त्यावरील ‘हॉटेल आमंत्रण’मध्ये विशाल शरद हंसारी (वय ३६, रा. इंदूर, मध्यप्रदेश) या तरुणावर तीन संशयितांनी धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ६ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर येथील विशाल हंसारी हे त्यांचे शालक कुणाल बारसे व राहुल हाडा यांच्यासह ६ मे रोजी सायंकाळी जेवणासाठी हॉटेल आमंत्रण येथे गेले होते. यावेळी दुसऱ्या टेबलावर बसलेले तिघ संशयित हंसारी आणि त्यांच्या मित्रांकडे एकसारखे पाहत होते. ‘तुम्ही तुमचे जेवण करा, आमच्याकडे बघू नका’ असे हंसारी यांनी संशयितांना सुनावले. याच गोष्टीचा राग आल्याने संशयितांनी सुरुवातीला त्यांना शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली.
​या वादादरम्यान, संशयित तुषार सोनवणे याने आपल्या कमरेला खोचलेला चाकू काढून विशाल हंसारी यांच्या पोटावर खोल वार केला. या हल्ल्यात हंसारी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर हंसारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तुषार ईश्वर सोनवणे (रा. जोशीवाडा, मेहरुण), राज रमेश सोनवणे (रा. शिंदे गल्ली, गेंदालाल मिल) आणि विशाल नामक एका इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button