इतर

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने ५० हजारांची फसवणूक

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने ५० हजारांची फसवणूक

जळगाव शहरातील एसबीआय एटीएममध्ये घडली घटना; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील भिलपुरा चौक परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका नागरिकाची ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश भागवत सूर्यवंशी (वय ५८) हे जळगाव महानगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत असून ते कांचननगर परिसरात राहतात. दिनांक १ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते भिलपुरा चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.

यावेळी अज्ञात व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधत एटीएम व्यवहारादरम्यान फसवणूक केली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून तब्बल ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचे समोर आले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक ९९/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयिताचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button