लाडक्या बहिणींनी दिले वचन.. भाऊबीज ओवाळणीची परतफेड म्हणून करणार अमोलभावाला आमदार!
लाडक्या बहिणींनी दिले अमोल पाटलांना आशिर्वाद, मत टाकणार पारड्यात
खान्देश टाइम्स न्यूज l प्रतिनिधी l एरंडोल पारोळा भडगाव मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचार दरम्यान महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या औक्षण करतानाभाऊबीजेची ओवाळणी ची परतफेड म्हणून करणार अमोल अश्या भावाला आमदार! अशी प्रतिक्रिया भोळण गावातील विजया पाटील यांनी दिली.
महायुतीचे उमेदवार अमोल पाटील व त्यांच्या कार्यकर्ता सोबत टिटवी, शिरसमणी, चोरवड, भोडन, पोपट नगर प्रचार करताना प्रत्येक ठिकाणी अमोल पाटील यांचे औक्षण करताना लाडक्या बहिणींनी प्रतिक्रिया दिल्या.
चोरवड गावात प्रचाराची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व नतमस्तक होऊन पुढे प्रचाराची सुरुवात केली दरम्यान महादेव मंदिरात सुद्धा दर्शन घेतले. प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना प्रत्येकास आ.चिमणराव पाटील यांच्या कार्यास पुढे नेण्यासाठी अमोलदादांना विजयी करा अशी घोषणा देत होते.
याप्रसंगी चोरवड येथील विद्यमान सरपंच राकेश पाटील, उपसरपंच विजय पाटील, माजी सरपंच किरण पाटील, विनोद पाटील, भैय्यासाहेब पाटील सरपंच, विजया पाटील, अशोक पाटील आदी कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते.